Team India : टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पुढील मालिका केव्हा? पाहा वेळापत्रक

 

Indian Cricket Team : टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जाणून घ्या भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर किती महिन्यांनी पुढील मालिका खेळणार आहे.





भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला पराभूत करत 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. एकूण 10 संघांमध्ये 2 महिने चमचमीत ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस असणार आहे. मात्र टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता केव्हा एक्शन मोडमध्ये दिसणार? असाही प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. टीम इंडियाची पुढील मालिका केव्हा असणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर तब्बल 3 महिन्यांनी मैदानात खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया जून महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघ या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप 2025-2027 या साखळीतील ही पहिली मालिका असणार आहे. या मालिकेत उभयसंघात 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मालिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक

इंग्लंड विरुद्ध भारत, पहिला कसोटी सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले, लीड्स

इंग्लंड विरुद्ध भारत, दुसरा कसोटी सामना, 2 ते 6 जुलै, एडबस्टन, बर्मिंगघम

इंग्लंड विरुद्ध भारत, तिसरा कसोटी सामना, 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स

इंग्लंड विरुद्ध भारत, चौथा कसोटी सामना, 23 ते 27 जुलै, मँचेस्टर

इंग्लंड विरुद्ध भारत, पाचवा कसोटी सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, केनिंग्टन ओव्हल, लंडन

कसोटी मालिकेला केव्हापासून सुरुवात?

भारताच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 4 ऑगस्टला सांगता होणार आहे. या दरम्यान एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाने गेल्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली याच्या नेतृत्वात 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र कोरोनामुळे चौथ्या कसोटी सामन्याची तारीख बदलण्यात आली. त्यानंतर 2022 साली अखेरचा सामना खेळवण्यात आला. इंग्लंडने हा सामना जिंकून 4 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरी राखली आणि टीम इंडियाला मालिका जिंकण्यापासून रोखलं.

No comments

Powered by Blogger.