RR vs KKR : क्विंटनची धमाकेदार खेळी, केकेआरचा 8 विकेट्सने कडक विजय, राजस्थानचा सलग दुसरा पराभव
Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders Match Result : क्विंटन डी कॉक याने गुवाहाटीत धमाकेदार खेळी करत केकेआरला या मोसमातील पहिलावहिला विजय मिळवून दिला आहे. केकेआरने राजस्थानचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून दिला.
केकेआरची बॅटिंग
मोईन अली आणि क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने केकेआरला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 41 धावा केल्या. मात्र त्यानंतर मोईन सातव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 5 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कॅप्टन रहाणे मैदानात आला. रहाणेने क्विंटनसह दुसर्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या. रहाणे 15 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 18 रन्स करुन माघारी परतला. रहाणे आऊट झाल्यानंतर केकेआरचा स्कोअर 10.1 ओव्हरमध्ये 2 आऊट 70 असा झाला.
त्यानंतर मुंबईच्या अंगकृष रघुवंशी याने क्विंटन डी कॉकला या अप्रतिम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची नाबाद आणि विजयी भागीदारी केली. अंगकृष रघुवंशी याने 17 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 22 धावांची खेळी केली. तर क्विंटनने 64 चेंडूत 159.02 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 97 धावा केल्या. क्विंटनने यादरम्यान 6 षटकार आणि 8 चौकार झळकावले. क्विंटनचं हे केकेआरसाठी पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. तर राजस्थानसाठी वानिंदु हसरंगा याने एकमेव विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे आणि संदीप शर्मा.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
Post a Comment