Movies Releases in March 2025: दोन, पाच किंवा 10 नाहीतर, मार्चमध्ये रिलीज होणार 15 धमाकेदार फिल्म्स; बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सलमान, सुनील, जॉन सज्ज
Movies Releases in March 2025: मार्च हा 2025 सालचा पहिला फेस्टिव्ह मंथ आहे. होळी, ईद यांसारख्या सणांची धम्माल मस्ती या महिन्यात पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत मार्च महिन्यात अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहेत.
चित्रपटाचं नाव | रिलीज डेट | प्लॅटफॉर्म | भाषा |
मिकी 17 | 7 मार्च | थिएटर्स | इंग्लिश |
नादानियां | 7 मार्च | नेटफ्लिक्स | हिंदी |
द डिप्लोमेट | 14 मार्च | थिएटर्स | हिंदी |
बी हॅपी | 14 मार्च | प्राईम व्हिडीओ | हिंदी |
केसरी वीर | 14 मार्च | थिएटर्स | हिंदी |
इन गिलयों में | 14 मार्च | थिएटर्स | हिंदी |
माई मेलबर्न | 14 मार्च | थिएटर्स | हिंदी |
स्नो व्हाईट | 21 मार्च | थिएटर्स | हिंदी |
तुमको मेरी कसम | 21 मार्च | थिएटर्स | हिंदी |
बैदा | 21 मार्च | थिएटर्स | हिंदी |
एल 2 इम्पुरन | 27 मार्च | थिएटर्स | पॅन इंडिया फिल्म |
वीर धीरा सूरन 2 | 27 मार्च | थिएटर्स | तमिळ |
सिकंदर | 28 मार्च | थिएटर्स | हिंदी |
हरि हरा वीरा मल्लु | 28 मार्च | थिएटर्स | पॅन इंडिया फिल्म |
रॉबिनहुड | 28 मार्च | थिएटर्स | तेलुगु |
दस्तक | सलमान खान-सुनील शेट्टी | माहिती समोर आलेली नाही | माहिती समोर आलेली नाही |
थिएटर्स-OTT वर रिलीज होणार फिल्म्स
मार्चमध्ये रिलीज होणाऱ्या नव्या चित्रपटांसाठी प्रेक्षकांचा मूड सेट झाला आहे. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटासोबतच इतर अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. प्रदर्शित होणारे बहुतेक चित्रपट हिंदी भाषेत आहेत. पण मार्चमध्ये दोन संपूर्ण भारतात चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या नजरा या चित्रपटांवर असतील. यामध्ये काही चित्रपट असे आहेत जे ओटीटीवरही येत आहेत, तर दुसरीकडे बहुतेक चित्रपट फक्त थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत.
सध्या 'छावा'चा जलवा
सध्या, विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाची कमाई इतकी आहे की, त्यानं पुष्पा 2 आणि बाहुबली 2 सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट येणाऱ्या सर्व चित्रपटांचा खेळ खराब करू शकतो, अशी भिती अनेकांना सतावतेय. विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट रिलीजच्या 3 आठवड्यांनंतरही अनेक कमी बजेटच्या चित्रपटांसाठी स्पर्धा ठरू शकतो.
Post a Comment