IIT Baba: आयआयटीयन बाबांची मार्क्सशिट्स व्हायरल,मार्क्स पाहाल तर धक्का बसेल…

 

आयआयटी मुंबईचे अभय सिंह यांचे एक माजी सहकारी गौरव गोयल यानी एका मुलाखतीत सांगितले की अभय सिंह हे टॉपर होते, परंतू त्यांनी आता संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे. जो माझ्यासाठी देखील आश्चर्याचा धक्का आहे.



IIT Baba Abhay Singh, IITian Baba: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ २०२५ मध्ये सतत चर्चेत असलेले आयआयटीयन बाबा  पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सर्व जण त्यांना आयआयटीयन बाबा नावानेच ओळखत आहेत. त्यांचे खरे नाव अभय सिंह आहे. त्यांनी मुंबई आयआयटीमधून आयआयटी पूर्ण केले आहे. त्यामुळे त्याना आयआयटीयन बाबा नाव पडले आहे. महाकुंभनंतर अभय सिंह यांना जयपूर येथे गांजासह अटक झाली होती. तर त्यांना एका डिबेट शोमध्ये मारहाण झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले. आता त्यांची मार्क्सशिट्स व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या मार्क्सशिट्स बद्दलही वेगवेगळे दावे केले जात आहे. चला तर पाहूयात कसी ‘आयआयटीएन बाबा’ने १० वी आणि १२ वीत किती मार्क्स मिळवले होते. त्यांना जेईई परीक्षेत किती गुण मिळाले होते ते पाहूयात…..

‘आईआईटीयन बाबा’ ची मार्क्सशिट्स व्हायरल –

IIT Baba Abhay Singh Viral Marksheet : 10वी, 12वी किती गुण मिळाले

एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार अभय सिंह यांना १० वी आणि १२ वीची जी मार्क्सशीट व्हायरल होत आहे त्यात त्यांना १० वीत ९३ टक्के आणि १२ वीत ९२.४ टक्के गुण मिळाले आहेत.त्यामुळे अभय सिंह अभ्यासात अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांनी साल २००८ मध्ये आयआयटी – जेईई परीक्षा दिली होती. त्यात अभय सिंह यांना ७३१ वा रँक ( AIR 731) मिळाला होता. त्यानंतर त्यांना मुंबई आयआयटीत प्रवेश मिळाला होता.अभय सिंह यांनी २००८-२०१२ बॅचमध्ये आयआयटी बॉम्बेतून एअरोस्पेस इंजीनियरिंगमध्ये बी.टेक ( B.Tech ) केले आहे.

IIT Baba Abhay Singh Jobs: कॅनडात नोकरी

अभय सिंह यांनी अभ्यास पूर्ण केल्यानंतर कॅनडात नोकरी देखील केली होती. आपल्या अलिकडच्या विविध मुलाखतीत अभय सिंह यांनी सांगितले की त्यांनी कॅनाडात तीन वर्षांपर्यंत एका प्रायव्हेट कंपनीत काम केले. त्यांना वार्षिक पगार म्हणून ३६ लाख पगार दिला जात होता. त्यांनी नंतर नोकरी सोडली आणि आत्मशोधासाठी निघाले. अभय सिंह यांनी डिझाईनमध्ये मास्टर्स ( M.Des)  डिग्री घेतली होती. आणि फोटोग्राफीत देखील आपली कला दाखविली होती.

No comments

Powered by Blogger.