Holi 2025: भारतातच नाही तर ‘या’ देशांमध्येही मोठ्या थाटामाटात धुळवड होते साजरी
यावर्षी धुळवड म्हणजेच रंगपंचमी 14 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. भारतातील अनेक भागांमध्ये धुळवड मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की केवळ भारतातच नाही तर जगभरात असे अनेक देश आहेत जिथे होळी साजरी केली जाते. चला तर या देशांबद्दल जाणुन घेऊयात...
पण तुम्हाला माहिती आहे का की केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही रंगपंचमी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते? परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाने हा उत्सव त्यांच्या संस्कृतीशी जोडला आहे आणि तेथील स्थानिक लोकंही रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. चला तर मग जाणून घेऊया की भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या देशांमध्ये रंगपंचमी हा सण साजरा केला जातो…
नेपाळ
नेपाळ हा भारताच्या शेजारील देश असण्यासोबतच, हिंदू संस्कृतीशीही खोलवर जोडलेले आहे. येथे रंगपंचमीला फागु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते आणि ती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. काठमांडू आणि पोखरा सारख्या मोठ्या शहरांमध्ये, रंगपंचमीच्या दिवशी तेथील रस्ते हे रंग, संगीत आणि नृत्याने भरलेले असतात. तसेच त्यांच्या देशामध्ये सुद्धा लोकं एकमेकांना रंग, पाण्याचे फुगे आणि गुलाल उधळून रंगवतात.
मॉरिशस
मॉरिशसमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय राहत असल्याने या देशामध्ये सुद्धा रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. येथील रंगपंचमीचा उत्सव भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रंगपंचमीसारखाच आहे. भजन-कीर्तन, होलिका दहन आणि रंगांशी खेळण्याची परंपरा देखील येथे पाहायला मिळते. मॉरिशस सरकार देखील या सणाला राष्ट्रीय सुट्टी देत, हा सण साजरा करणाऱ्याला मान्यता दिली आहे.
फिजी
फिजी हा असा देश आहे जिथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. असे मानले जाते की येथे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांची संख्या जास्त आहे. येथे रंगपंचमी पारंपारिकपणे संगीत आणि नृत्याने साजरी केली जाते. स्थानिक लोकं देखील या उत्सवात सामील होतात आणि बहुरंगी उत्सव म्हणून साजरा करतात.
पाकिस्तान
भारताच्या फाळणीनंतरही अनेक हिंदू पाकिस्तानमध्ये राहतात. विशेषतः सिंध प्रांत, कराची, लाहोर आणि इतर काही भागात. येथे राहणारे हिंदू कुटुंबे पूर्ण उत्साह आणि भक्तीने रंगपंचमी साजरी करतात. हिंदू मंदिरे आणि सामुदायिक केंद्रांमध्ये भव्य रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित करतात. पाकिस्तानमध्येही लोकं एकमेकांना गुलाल आणि रंग लावून हा सण साजरा करतात.
बांगलादेश
बांगलादेशातही मोठ्या उत्साहात हिंदू रंगपंचमी साजरी करतात. ढाका, चितगाव आणि सिल्हेट सारख्या भागात विशेषतः रंगपंचमी सण साजरा होतो. तसेच येथे होळीला डोल पौर्णिमा किंवा वसंत उत्सव असेही म्हणतात. भारताप्रमाणेच, येथील हिंदू समुदायाचे लोक रंग आणि गुलाल उधळून रंगपंचमी खेळतात. मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि हवन आयोजित केले जातात.
Post a Comment