Gold Silver Rate Today 8 March 2025 : चांदीची तुफान घोडदौड, सोन्याची आनंदवार्ता, 10 ग्रॅमचा दर काय, किलोसाठी किती मोजावा लागेल पैसा

 

Gold Silver Rate Today 8 March 2025 : सोन्याची आणि चांदीची काय वार्ता असे विचारले तर गेल्या आठवड्याप्रमाणे सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला आहे. तर चांदीने भरारी घेतली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...



गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. या सोमवारी आणि मंगळवारी सोन्याने मोठी झेप घेतली. 1360 रुपयांनी सोने महागले. त्यानंतर सलग दोन दिवसांपासून या धातुत पडझड सुरू आहे. दुसरीकडे चांदी गेल्या आठवड्यात 5 हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत आहे. सध्या सराफा बाजाराचे अमेरिकन धोरणाकडे लक्ष लागले आहे. जागतिक गुंतवणूकदार सुद्धा विचारपूर्वक पाऊल टाकत आहे. त्यामुळे दोन्ही धातुत चढउताराचे सत्र दिसून येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने एक लाखांच्या टप्प्यात येईल तर चांदी किलोमागे अजून 10 हजारांनी महाग होईल. अर्थात हा केवळ अंदाज आहे. जागतिक परिमाण बदलले की त्याचे परिणाम दिसून येतील. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 8 March 2025 )

दुसर्‍या दिवशी सोने स्वस्त

या सोमवारी सोने 760 रुपयांनी तर मंगळवारी 600 रुपयांनी महागले होते. तर बुधवारी सोने 490 रुपयांनी आणि गुरुवारी 330 रुपयांनी उतरले. तर आज सकाळी सुद्धा स्वस्ताईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची भरारी

गेल्या आठवड्यात चांदी 5 हजारांनी उतरली होती. तर या आठवड्यात 2100 रुपयांनी चांदी महागली. सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. मंगळवारी किंमतीत बदल दिसला नाही. बुधवारी चांदी पुन्हा एक हजारांनी वधारली. गुरुवारी शंभर रुपयांनी किमत वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,100 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,059, 23 कॅरेट 85,714, 22 कॅरेट सोने 78,830 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,544 रुपये, 14 कॅरेट सोने 50,345 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,724 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

No comments

Powered by Blogger.