Champions Trophy: भारताच्या विजयासह ठरले उपांत्य फेरीचे वेळापत्रक, तारीख आणि वेळ लक्षात घ्या
Champions Trophy Semi-Final Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. यासह त्याने स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला.
Champions Trophy Semi-Final Schedule: अ गटातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताची टक्कर न्यूझीलंडशी होती. भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव करत विजय मिळवला. यासह टिमकी इंडियाने स्पर्धेतील सलग तिसरा विजय संपादन केला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरु असलेल्या या सिजनमध्ये तिन्ही सामने जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे. त्याचवेळी न्यूझीलंडला प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. आता दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले होते. या सामन्यासह अंतिम-4 चे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
भारत पोहचला पहिल्या स्थानावर
अ गटात भारत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. भारताचे 3 सामन्यांत 6 गुण आहेत. टीम इंडियाचा रन रेट +0.715 होता. न्यूझीलंड 3 सामन्यांत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा निव्वळ रन रेट +0.267 होता. बांगलादेश आणि यजमान पाकिस्तान आधीच या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. दोघेही अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
ब गटात कोण आहे नंबर-1?
दुसरीकडे, ब गटात दक्षिण आफ्रिका 3 सामन्यांत 5 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ हा 3 सामन्यांत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान 3 सामन्यांत 3 गुणांसह तिसऱ्या तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे दोन्ही संघांचे १-१ गुण झाले. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातही असेच घडले. पावसामुळे सामना रद्द झाला तेव्हा दोघांच्या खात्यात १-१ गुण जमा झाले.
सेमीफायनलचा फॉरमॅट
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नियमांनुसार, अ गटातील पहिल्या स्थानावर असलेल्या संघाचा उपांत्य फेरीत ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी सामना होईल. त्याचवेळी अ गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना ब गटातील नंबर एकवर असलेल्या संघाशी होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची उपांत्य फेरी
‘अ’ गटात पहिल्या स्थानावर असल्याने पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना ४ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. यानंतर दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून होणार आहेत तर टॉस दुपारी २.०० वाजता होईल.
Post a Comment