शिवजयंतीदिनी ‘छावा’ला मोठा झटका; विकी कौशलची जादू ओसरली?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी 'छावा' या चित्रपटाला मोठा झटका मिळाला आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची जादू आता ओसरताना दिसत आहे. कारण प्रदर्शनाच्या पाचव्या सोमवारी या चित्रपटाने सर्वांत कमी कमाई केली.
पाचव्या आठवड्यात ‘छावा’ने एकूण 22 कोटी रुपये कमावले आहेत. पाचव्या आठवड्याच्या कमाईच्या बाबतीत विकी कौशलच्या ‘छावा’ने ‘स्त्री 2’ (16 कोटी), ‘पुष्पा 2’ (हिंदीत 14 कोटी) यांना मागे टाकलं आहे. मात्र पाचव्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत बरीच घट पहायला मिळाली. कारण त्या तुलनेत पहिल्या आठवड्यात 24 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 18 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 7.75 कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात 5.25 कोटी रुपये इतकी कमाई झाली होती.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाने भारतात केवळ 23 दिवसांत कमाईचा 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 700 कोटींच्या पार आहे. ‘छावा’ हा विकी कौशलच्या करिअरमधील आणि 2025 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
‘छावा’च्या कमाईचे महत्त्वपूर्ण मुद्दे-
- पहिल्या आठवड्यात ‘छावा’ची एकूण कमाई 219.25 कोटी रुपये इतकी होती
- दुसऱ्या आठवड्यात ‘छावा’ने 180.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता
- तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी रुपयांची कमाई झाली
- चौथ्या आठवड्यात ‘छावा’ने 55.95 कोटी रुपये कमावले
- प्रदर्शनाच्या 29 व्या दिवशी चित्रपटाने 7.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला
- प्रदर्शनाच्या तिसाव्या दिवशी 7.9 कोटी रुपयांची कमाई झाली
- 31 व्या दिवशी कमाईचा आकडा 8 कोटींवर पोहोचला
Post a Comment