लाडक्या बहिणींनो, बॅंक बॅलेन्स तपासलात का? महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आलंय गिफ्ट!

 

Laadki Bahin: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे.



Laadki Bahin: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. पण आता बॅंकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

1500 रुपयांवरच मानावं लागणार समाधान

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशानात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशानात 2100 रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना निवडणुकीत गेंमचेंजर ठरली. राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मागील अधिवेशनात तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांसदर्भातली घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरून सरकारने घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केली नाही. तो जाहीरनामा 5 वर्षांसाठी असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितलंय.

विरोधकांकडून टीका

तर महायुती सरकारने जाहिरनाम्यात दिलेली आश्वासनं खोटी होती ते हळू हळू स्पष्ट होत असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. तर सरकारच्या या घुमजाववरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केलीय. 

लाडकी योजनेच्या 83% लाभार्थी विवाहित महिला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये जवळपास 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत. अविवाहित महिला लाभार्थ्यांपैकी 11.8% आहेत तर विधवांचा वाटा 4.7% आहे. घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिला एकत्रितपणे 1% पेक्षा कमी लाभार्थ्यांचे आहेत, असे आकडेवारीवरून दिसून येते. घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी 0.3%, सोडून दिलेल्या महिला 0.2% आणि निराधार महिला 0.1% आहेत. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी 29% होती. त्यानंतर 21-29 वयोगटातील गट 25.5% होता तर 40-49 वयोगटातील गट लाभार्थ्यांपैकी 23.6% होता. खरंच, 78% लाभार्थी 21-39 वयोगटातील होते आणि 22% लाभार्थी 50-65 वयोगटातील होते. 60-65 वयोगटातील लाभार्थींचा वाटा जवळजवळ 5% होता. "60-65 वयोगटातील जवळजवळ 5% महिलांना लाभ मिळाला आहे.

No comments

Powered by Blogger.