राज्यातील शिवाजी महाराजांच्या पहिल्या भव्य मंदिराचे काम पूर्ण, या तारखेला लोकार्पण
Chatrapati Shivaji Maharaj Mandir Bhiwandi: छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ही अयोध्या येथील राम मंदिरातील रामलल्लांची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुर्तीकाराने घडवली आहे. अखंड कृष्णशिला या दगडातून सहा फूट उंचीची बनवली आहे
.
कृष्णशीला पाषाणातून घडवली मूर्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, स्वामी गोविंदगिरी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंदिराचा भव्यदिव्य लोकपर्ण सोहळा पार पडणार आहे. सात वर्षे सुरू असलेल्या काम पूर्णत्वास आले आहे.येथील सर्व वातावरण शिवमय झाले आहे.संपूर्ण तालुका व जिल्ह्यात या मंदिराची चर्चा सुरू झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून या मंदिराबाबत विचारणा होत आहे. शिवाजी राजांमुळे आपल्या हिंदूंची मंदिर वाचली त्या राजांचे एक मंदिर व्हावे अशी आमची भावना होती. ज्या राजांमुळे आपला शमीन हिंदुस्थान अखंड राहिला. आदिलशहा निजामशहा यांची आक्रमणे होत असताना आपले राजे त्यांच्या विरोधात उभे ठाकले ते लढले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती.त्यामुळे आम्ही हे मंदिर उभारले आहे, असे शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी सांगितले.
योगीराज यांनी महाराजांची पहिलीच मूर्ती घडवली
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ही अयोध्या येथील राम मंदिरातील रामलल्लांची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मुर्तीकाराने घडवली आहे. अखंड कृष्णशिला या दगडातून सहा फूट उंचीची बनवली आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिलीच मूर्ती आहे. चार वर्षांपूर्वी ती बनण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मध्यंतरी रामलल्ला यांच्या मूर्तीच्या कामामुळे त्यामध्ये खंड पडला होता. ही मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांनी विविध पैलूंचा अभ्यास करून या मूर्तीला जिवंत केले आहे.
36 शिल्पचित्रातून महाराजांचे जीवन प्रसंग
शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग त्यांचा इतिहास समाजाला कळावा यासाठी तटबंदी खालील जागेत 36 शिल्पचित्र बनवण्यात आले आहेत. त्याची माहिती मराठी इंग्रजी भाषेमध्ये दिली आहे.
Post a Comment