शांत समुद्र, काळी वाळू आणि…, मुंबईपासून हाकेच्या अंतरावरचा ‘मिनी गोवा’; आजच प्लान करा

 

Alibaug Must Visit Places : अलिबागला महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हटलं जातं. मुंबईपासून अवघ्या 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्हाला जर सुट्टी घालवायची असेल तर तुम्ही खुशाल या ठिकाणी जाऊ शकता. गोव्यासारखाच फिल तुम्हाला या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही.






महाराष्ट्रातील अलिबाग हे मिनी गोवा समजलं जातं. शांत समुद्र, काळू वाळू, ऐतिहासिक किल्ला आणि पराकोटीच्या शांततेमुळे अलिबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
अलिबागच्या समुद्रातच कुलाबा किल्ला आहे. हा किल्ला स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे पाण्यातील हा ऐतिहासिक किल्ला नजरेत भरून घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतात.



कुलाबा किल्ला समुद्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे.
या ठिकाणी कनकेश्वर मंदिर आहे. भगवान शंकराचं हे मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी जाण्यासाठी 650 शिड्या चढाव्या लागतात.
येथील नागाव बीच तर जेट-स्की, पॅरासेलिंग आणि बनाना बोट राइडसाठी फेमस आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ झाली नसती तर नवलचं.
किहीम बीच सुद्धा अत्यंत शांत असा किनारा आहे. नारळ पोफळीची झाडं आणि पक्षी पाहण्यासाठी पर्यटक खास या ठिकआमी येतात.
अलिबागला पोहोचणं अगदी सोप्पं आहे. अलिबाग मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे.
मुंबईतून जहाजाने किंवा बस वा कारनेही तुम्ही पोहोचू शकता. केवळ 100 किलोमीटरचं हे अंतर आहे.

No comments

Powered by Blogger.