मोबाईल की लॅपटॉप कोणता प्रकाश तुमच्या डोळ्यासाठी सर्वाधिक घातक?
आता तंत्रज्ञानाचं युग आहे. आजच्या काळात मोबाईल आणि लॅपटॉप या दोन गोष्टी तुमच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लॅपटॉप आणि मोबाईलपासून दूर राहू शकत नाहीत.
ब्लू लाईट
फोन, लॅपटॉप आणि टीव्ही सारख्या उपकरणामधून जो निळ्या कलरचा लाईट निघतो. तो थेट तुमच्या डोळ्यांच्या रेटिनापर्यंत पोहोचतो. या प्रकाशामुळे तुमच्या डोळ्यांचं मोठं नुकसान होतं. हा प्रकाश हळूहळू तुमच्या डोळ्यांच्या रेटिनाला कमकुवत करतो, तुम्ही जर दररोज मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत असाल तर तुमचे डोळे जळजळ करतात. तुम्हाला झोप आल्यासारखं होतं. जर तुम्ही वर्षानुवर्ष लॅपटॉपचा आणि मोबाईलचा वापर करत असाल तर भविष्यात तुम्हाला दृष्टी दोषासारखा प्रॉब्लेम देखील होऊ शकतात.
जर तुम्हालाही झोपण्यापूर्वी फोन वापरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा, कारण तुम्हाला त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. तुम्हाला शांत झोप लागणार नाही. झोपण्यापूर्वी कमीत कमी अर्धातास तरी तुमचा मोबाईल तुमच्यापासून दूर ठेवा. मोबाईलमधून निघणारा लाईट हा तुमच्या डोळ्यासाठी घातक ठरू शकतो. मोबाईलच्या अती वापरामुळे तुम्हाला डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.मोबाईच्या अतिवापरामुळे तुमचं मन देखील अस्वस्त होऊ शकतं.
तुमचा लॅपटॉप असो अथवा मोबाईल दोन्हीमधून निघणारा प्रकाश हा तुमच्या डोळ्यांसाठी हानीकारकच असतो. तुम्ही जर सतत मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करत असाल तर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या दोन्ही वस्तूंचा वापर करताना काळजी घ्यावी.
Post a Comment