हॉट की कोल्ड कॉफी, तुमच्या आरोग्यासाठी कोणती चांगली? जाणून घ्या

 

जगभरात कॉफीचे सेवन भरपूर प्रमाणात केले जाते. कॉफी हे बहुतेक लोकांचे आवडते पेय आहे. तर यामध्ये सूद्धा आता हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफीचे प्रकार मिळतात. जे अनेकजण आवडीने पितात. पण तुमच्यासाठी हॉट की कोल्ड कॉफी कोणते चांगले आहे? आजच्या या लेखात हे जाणून घेणार आहोत.




चहा बरोबरच आता कॉफी हे जगातील सर्वात प्रिय पेयांपैकी एक आहे. काही लोकांची सकाळची सुरुवात गरम कॉफीशिवाय होत नाही, तर काही लोकांना शरीराला थंडावा मिळावा आणि ताजेतवाने वाटण्यासाठी कोल्ड कॉफी प्यायला आवडते. अशातच हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफी यापैकी आरोग्यासाठी कोणती कॉफी जास्त फायदेशीर आहे? दोघांचे पौष्टिक मूल्य आणि परिणाम सारखेच आहेत का, कॉफीच्या या दोन प्रकारांचा आरोग्यावर अधिक सकारात्मक परिणाम होतो? असे अनेक प्रश्न पडतात.

तर कॉफीमध्ये कॅफिन, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर अनेक पोषक घटक असतात, जे तुम्हाला केवळ ऊर्जावान ठेवत नाहीत तर अनेक आरोग्य फायदे देखील देतात. तथापि, कॉफीचा परिणाम तुम्ही ती कशी पिता यावर अवलंबून असतो, गरम की थंड. आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दोन्हीपैकी कोणती कॉफी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे?

हॉट कॉफीचे फायदे

हॉट कॉफी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. जेव्हा वातावरणात थंडावा असतो तेव्हा बहुतांश लोकं ही हॉट कॉफी पिण्यास जास्त पसंत करतात. कारण त्याचे सेवन शरीराला उबदार ठेवते. तसेच हॉट कॉफीमध्ये जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यातच या हॉट कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदूसाठी देखील चांगले असते, जे मेंदूचे कार्य सुधारते आणि मूड स्विंगला प्रतिबंधित करते. यासोबतच ते चयापचय गतिमान करते, पचन सुधारते आणि याने आपले आरोग्य देखील सुधारते.

कोल्ड कॉफीचे फायदे

आता कोल्ड कॉफीबद्दल बोलायचे झाले तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. आणि ही कोल्ड कॉफी उन्हाळ्यात लोकांना खूप प्यायला आवडते. उन्हाळ्यात कोल्ड कॉफीच्या सेवनाने शरीर थंड राहते. कोल्ड कॉफीमध्येही गरम कॉफीइतकेच कॅफिन असते. अशाप्रकारे ते तुम्हाला उन्हाळ्यात ताजेपणा देते. हे आम्लता कमी करण्यास आणि हायड्रेशन रोखण्यास मदत करते. याशिवाय हे शरीराला त्वरित ऊर्जा देते आणि वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

कोणती कॉफी जास्त फायदेशीर आहे?

हॉट आणि कोल्ड कॉफ‍ीबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही कॉफीचे स्वतःचे वेगवेगळे फायदे आहेत. पण त्यांचे फायदे तुमच्या आरोग्यावर आणि गरजांवर अवलंबून असतात. जर तुम्हाला रक्ताभिसरण वाढवायचे असेल तर तुम्ही गरम कॉफी प्यावी. दुसरीकडे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि उन्हाळ्यात ताजेतवाने राहायचे असेल तर कोल्ड कॉफी हा एक चांगला पर्याय आहे.

No comments

Powered by Blogger.