फॉरेन लँग्वेज शिकण्यासाठी भारतातील टॉप युनिव्हर्सिटी कोणत्या? जाणून घ्या

 

तुम्ही भारतातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या शोधात असाल जिथे तुम्हाला परदेशी भाषा (फॉरेन लँग्वेज) शिकायला मिळेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा विद्यापीठांबद्दल सांगणार आहोत जिथून परदेशी भाषा शिकता येतात. जाणून घ्या.


आज आम्ही तुम्हाला शिक्षणामध्ये भाषेचं शिक्षण, याविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की, वेगवेगळ्या विद्यापीठात परदेशी भाषेचे कोर्स आहेत. नसेल माहिती तर आज आम्ही यावर अगदी सविस्तर सांगणार आहोत. तुमच्यासह अनेक विद्यार्थ्यांना फॉरेन लँग्वेज किंवा परदेशी भाषा शिकण्याची इच्छा असते. कारण यात तुम्हाला करिअरला भरपूर वाव मिळतो. भारतातून दरवर्षी लाखो लोक परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जातात. अशा देशांमध्ये, जिथे इंग्रजी बोलली जाते, लोक काम आणि अभ्यासासह इंग्रजी शिकतात. मात्र, काही देश असे आहेत, जिथे इंग्रजी बोलली जात नाही. या देशांमध्ये नोकरी किंवा शिक्षण मिळणे थोडे अवघड होऊन बसते.

अशावेळी जर तुम्ही भारतातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या शोधात असाल जिथे तुम्हाला परदेशी भाषा शिकायला मिळेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा विद्यापीठांबद्दल सांगणार आहोत जिथून परदेशी भाषा शिकता येतात.

बनारस हिंदू विद्यापीठ (BHU)

बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे पदवी, पदविका आणि पदव्युत्तर परदेशी भाषा अभ्यासक्रम प्रदान करते. इथून तुम्ही परदेशी भाषांचा अभ्यास करू शकता. या विद्यापीठात फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि चायनीज भाषेतील अभ्यासक्रम चालवले जातात.

दिल्ली विद्यापीठ

देशाच्या राजधानीतील दिल्ली विद्यापीठात परदेशी भाषेचा कोर्सही करू शकता. हे विद्यापीठ आधुनिक अरबी, पाली, तिबेटी भाषा आणि साहित्य, फ्रेंच भाषा, जर्मन, स्पॅनिश, इटालियन आणि पर्शियनमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रदान करते.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. येथे अनेक प्रकारचे भाषा अभ्यासक्रम शिकवले जातात. पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी स्तराचे अभ्यासक्रम येथे शिकवले जातात.

पंजाबमधील अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठात

गुरु नानक देव विद्यापीठात फ्रेंच भाषेतील पदविका अभ्यासक्रमही चालवला जातो. याशिवाय चिनी, फ्रेंच, जर्मन, जपानी आणि रशियन भाषेतही प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. तुम्ही तुमचा अभ्यास इथे करू शकता.

परदेशी भाषा शिकण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्ही अभ्यास केल्यानंतर चांगला पगार मिळवू शकता. अनुवादक म्हणून तुम्हाला वार्षिक 3 ते 8 लाख रुपये पगार मिळू शकतो. तर, परदेशी भाषा शिक्षकाचा पगार वार्षिक अडीच ते सात लाख रुपये आहे. याशिवाय टुरिस्ट गाईड बनून तुम्ही एका महिन्यात लाखो रुपये कमवू शकता.


No comments

Powered by Blogger.