वेरुळ लेणीतील बुद्धमूर्तीला सूर्यस्नान; पाहा कशी मिळाली सोनेरी किरणांची झळाळी

 

कमाल... पर्यटकांनी अनुभवला निसर्गाचा अद्विती आविष्कार. तो क्षण शब्दांतही मांडता येणार नाही इतका कमाल. तुम्हीही प्रत्यक्ष अनुभवू शकता हा क्षण...  







ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ लेणी इथं नुकताच एक अद्वितीय क्षण पर्यटकांना आणि स्थानिकांना अनुभवता आहा. जिथं (Ellora caves) वेरुळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीमध्ये असणाऱ्या बौद्ध मूर्तीवर सोमवारी किरणोत्सव झाला. 

पर्यटकासह भाविकांनी या क्षणाचं साक्षीदार होत त्याचे कैक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही केले. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असणाऱ्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत. 

याच लेण्याच्या समुहातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणं स्पर्शून जातात. हीच सूर्यकिरणं यावेळी मूर्तीच्या चेहऱ्यावर आली आणि जणू या मूर्तीला सूर्यस्नानं झालं. येत्या दिवसांत साधारण पाच ते सहा दिवस हा सोहळा इथं येणाऱ्या पर्यटकांसह भाविकांना अनुभवण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे. तर यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पंही पहायला मिळतात.

तुम्हालाही हा क्षण अनुभवायचाय? 

प्रत्यक्षात वेरूळ लेणीला भेट देऊन तिथं जाऊन अनेकांनाच येत्या दिवसांमध्ये हा क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार वेरूळ लेणी किंवा एल्लोरा केव्ह्ज ही छत्रपती संभाजी नगर शहरापासून साधारण 30 किमी अंतरावर स्थित असून, यामध्ये सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. विकीपीडियावरील माहितीनुसार हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्यामुळं तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात राहिल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नव्हे तर, राजघराण्यातील व्यक्ती आणि काही उत्साही अभ्यासू प्रवासी यांनीदेखील त्या काळात या लेण्यांना भेट दिल्याची नोंद आढळते.


No comments

Powered by Blogger.