Amaze की Dzire होळीला कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? कोणता पर्याय Best जाणून घ्या

 

Honda Amaze Vs Maruti Dzire : भारतामध्ये कॉम्पॅक्ट सेडान कॅटेगरीमध्ये Honda ची नवीन Amaze किंवा Maruti ची नवीन Dzire घेण्याचा प्रयत्न करताय?  

Honda Amaze Vs Maruti Dzire : भारतामध्ये कॉम्पॅक्ट सेडान कॅटेगरीमध्ये आपल्याला अनेक पर्याय मिळतात. असं असलं तरी जेव्हा सुरक्षा, आराम आणि स्टाइलची गोष्ट येते, तेव्हा Honda ची नवीन Amaze आणि Maruti ची नवीन Dzire यांचा विषय तर नक्कीच येतो. आता भारतात अनेक लोक कोणता सण असेल तेव्हा कोणतीही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करतात. अशात जर तुम्ही देखील होळीच्या निमित्तानं गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि गोंधळलेले असाल की कोणती गाडी घ्यायची. त्यातही जर तुमच्या डोक्यात फक्त दोन Honda ची नवीन Amaze आणि Maruti ची नवीन Dzire हे दोन पर्याय असतील तर आज आपण त्या दोन्ही कार बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जेणे करून तुम्हाला या दोघांपैकी कोणती गाडी घेणं तुमच्या सोयीनुसार योग्य असेल याविषयी तुम्हाला कळेल.

Honda Amaze

इंजन आणि पावर: हॉन्डा अमेजमध्ये 1.2-लीटर चार-सिलेंडर आई-वीटीईसी पेट्रोल इंजिन आहे. जे 89 बीएचपीची पावर आणि 110 एनएम टॉर्क देते. या इंजिनला एमटी किंवा सीव्हीटी गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे. एमटी वेरिएंटसह 18.65 किमी/लिटर मायलेज मिळतो, तर सीव्हीटी व्हेरिएंटसह 19.46 किमी/लिटर मायलेज मिळतो.

किती आहे Honda Amazeची किंमत?

Amaze 2024 तीन ट्रिम लेव्हल्समध्ये उपलब्ध आहे. V, VX आणि ZX ट्रिम्स. 45 दिवसांसाठी, सेडानचा एन्ट्री-लेव्हल व्हेरिएंट 7.99 लाख (एक्स-शोरूम प्राइस) मध्ये विकला जात आहे.

Maruti Dzire

इंजन आणि पावर: Maruti Dzire 2024 मध्ये 1.2-लीटर Z सीरीज पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 5,700 rpm वर 82 bhp आणि 4,300 rpm वर 112 Nm टॉर्क देते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्ससह येते. मायलेजबाबत, पेट्रोल मॉडेलमध्ये 25-26 किमी/लिटर मिळतो, तर CNG मॉडेलमध्ये 33 किमी/किलोग्राम मायलेज मिळतो.

Maruti Dzire किंमत?

पेट्रोल मॅन्युअल वेरिएंट LXi साठी 6.79 लाख (एक्स-शोरूम) किंमत आहे. या कारमध्ये LXi, VXi, ZXi, ZXi प्लस सारखे विविध व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. 



No comments

Powered by Blogger.