कोट्यवधी मोबाईल यूजर्सचं टेन्शन कायमचं मिटलं, आला 6 महिने वॅलिडीटीचा सर्वात स्वस्त प्लान!
Cheapest Recharge Plan: तुम्हीदेखील महागड्या रिचार्ज प्लॅनला कंटाळला असाल आणि जास्त वॅलिडीटीचा प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Cheapest Recharge Plan: सध्या मोबाईल कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान खूप महाग केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे टेन्शन वाढलंय.त्यांना दर महिन्याला आपला खिसा खाली करावा लागतोय. तुम्हीदेखील महागड्या रिचार्ज प्लॅनला कंटाळला असाल आणि जास्त वॅलिडीटीचा प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणलाय. बीएसएनएलचा नवीन प्लान येताच बाजारात टेलिकॉम कंपन्याची स्पर्धा खूपच वाढली आहे. या नवीन प्लानमध्ये बीएसएनएल आपल्या ग्राहकांना अर्ध्या वर्षाची वॅलिडीटीदेखील मिळणार आहे. बीएसएनएलच्या नवीन रिचार्ज प्लॅनची वॅलिडीटी दीर्घकाळ आहे. कंपनीकडे आधीच जास्त वॅलिडीटीचे प्लॅन आहेत. पण आता ग्राहकांची मोठ्या वॅलिडीटीची वाढती क्रेझ पाहून कंपनीने आणखी एक प्लान आणलाय. त्यामुळे आता तुम्हाला अधिक वैधतेसाठी जास्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसेल.
होळीच्या आधी एक मोठी भेट
बीएसएनएलने होळीपूर्वी करोडो मोबाईल यूजर्ससासाठी 750 रुपयांचा नवीन प्लॅन आणून मोठा धमाका केलाय. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता दिली जातेय. म्हणजेच तुम्ही या परवडणाऱ्या किंमतीत संपूर्ण सहा महिने रिचार्जच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. यामुळे मोबाईल क्रमांक बंद होण्याचे टेन्शनही संपेल. बीएसएनएलने त्यांच्या GP2 यूजर्ससाठी हा रिचार्ज प्लॅन आणलाय. रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर 7 दिवसांपर्यंत रिचार्ज करत नाहीत, ते जीपी2 अंतर्गत येतात.
मोफत कॉलिंग आणि डेटाचं टेन्शन संपलं
बीएसएनएलच्या 750 रुपयांच्या प्लॅनचे काय फायदे आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या प्लानमध्ये ग्राहकांना 180 दिवसांसाठी अनलिमिटेड मोफत कॉलिंग मिळेल. यासोबतच कंपनी सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कसाठी दररोज 100 मोफत एसएमएस मिळतायत. या प्लॅनद्वारे तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय दररोज अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. यामध्ये तुम्हाला 180 दिवसांच्या वॅलिडीटीसाठी 180 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच तुम्ही या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी पर्यंत हाय स्पीड इंटरनेट डेटा वापरू शकता. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्ही इंटरनेट वापरू शकाल. पण या काळात तुम्हाला फक्त 40kbps च्या वेगाने डेटा कनेक्टिव्हिटी मिळेल.
Post a Comment