आता धडाक्यात साजरी करा धुळवड, पुण्यातून 13 जादा ट्रेन, धावत्या रेल्वेवर पाण्याचे फुगे फोडल्यास तुमच्या चेहर्‍याचा असा रंग उडणार

 

Holi Special Train from Pune : होळीसह धुळवडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. हा सण कुटुंबियासोबत साजरा करण्यासाठी अनेक जण आतुर झाले आहेत. त्यातच तीन दिवस सुट्या आल्याने होळीसाठी पुण्यातून तेरा जादा ट्रेन सोडण्यात येत आहे. गर्दी होऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.




होळी आणि धुळवडीच्या वेळी तीन दिवसांच्या सुट्टीने मुक्काम ठोकल्याने चाकरमान्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. कुटुंबियांसोबत धुळवड साजरी करता यावी यासाठी अनेक जण आतुर झाले आहेत. होळीसाठी पुण्यातून तेरा जादा ट्रेन सोडण्यात येत आहे. गर्दी होऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे होळीच्या दिवशी काही समाजकंटक धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाचे, पाण्याचे फुगे फोडतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. डोळ्याला इजा होण्याची भीती असते. रेल्वे पटरीजवळील दाट लोक वसाहतीत हा प्रकार आढळतो. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी असा लोकांना कारवाईचा इशारा दिला आहे.

13 विशेष रेल्वे

उन्हाळ्याच्या सुटीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन पुणे रेल्वे विभागाने होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे. प्रवाशांची व्यवस्था रेल्वे कडून करण्यात आली आहे. याबाबत पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष राजेश कुमार वर्मा यांनी दिली.

प्रवाशांसाठी मोठी व्यवस्था रेल्वे स्टेशनवर करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ नये म्हणून दानापूर एक्सप्रेस किंवा उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला मंडप टाकण्यात आलेला आहे.

असे आहे रेल्वेचे वेळापत्रक

पुणे-दानापुर-पुणे विशेष (२ फेऱ्या) गाडी क्रं (०१४१९) विशेष ट्रेन पुणे येथून ११.०३.२०२५ रोजी १९:५५ वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी ०४.३० वाजता दानापुर येथे पोहोचेल. गाडी क्र.(०१४२०) ही विशेष ट्रेन दानापुर येथून १३.०३.२०२५ रोजी ०६:३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी १७:३५ वाजता पोहोचेल. पुणे – मालदा टाउन विशेष ट्रेन (२ फेऱ्या) गाडी क्रं (०३४२६) विशेष ट्रेन पुणे येथून २३.०३.२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी १६.३० वाजता मालदा टाऊन येथे पोहोचेल. गाडी क्रं (०३४२५) ही विशेष ट्रेन मालदा टाऊन येथून २१.०३.२०२५ रोजी १७.३० वाजता आणि तिसर्‍या दिवशी ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

हडपसर-हिसार विशेष ट्रेन (४ फेऱ्या) गाडी क्रं (०४७२६) ही विशेष ट्रेन हडपसर येथून १०.०३.२०२५ आणि १७.०३.२०२५ रोजी १७.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी २२.२५ वाजता हिसार येथे पोहोचेल. गाडी क्रं (०४७२५) ही विशेष ट्रेन हिसार येथून ०९.०३.२०२५ आणि १६.०३.२०२५ रोजी ०५.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १०.४५ वाजता हडपसर येथे पोहोचेल. कलबुर्गी- सर एम विश्वसरया टर्मिनल बेंगळुरू विशेष – (४ फेऱ्या) गाडी क्रं (०६५२०) ही विशेष ट्रेन कलबुर्गी येथून १४.०३.२०२५ आणि १५.०३.२०२५ रोजी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.०० वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल. गाडी क्रं (०६५१९) ही विशेष ट्रेन बेंगळुरू येथून १३.०३.३०२५ आणि १४.०३.२०२५ रोजी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ७.४० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल

धावत्या रेल्वेवर फुगे फेकल्यास कारवाई

धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला आहे. होळी, तसेच धुलिवंदनानिमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. होळी, तसेच धुलिवंदनानिमित्त मोठ्या प्रमाणावर रंग खेळला जातो. उत्साहाच्या भरात काही जण धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकतात.

दाट वस्तीतून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर फुगे फेकण्यात येतात. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांकडून पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर, लोणावळा, चिंचवड तसेच दौंड स्थानक परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. धावत्या रेल्वे गाडीवर फुगे फेकल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे. होळी, धुलिवंदनानिमित्त पुणे शहर, परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

धुलीवंदनासाठी बाजारपेठा सजल्या

होळी आणि धुलीवंदनासाठी लोणावळ्यातील बाजारपेठा सजल्या हेत धुलीवंदनासाठी पिचकारी आणि रंगांच्या किंमतीत 30 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. लोणावळा शहरात होळी आणि धुलीवंदनाची धामधूम सुरू झाली आहे. धुलीवंदनासाठी बाजारात विविध रंग, पिचकार्‍या आणि रंगांची खेळणी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मात्र, यंदा मागील वर्षाच्या तुलनेत या वस्तूंच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. व्यापार्‍यांच्या मते, उत्पादन खर्च आणि वाहतूक दर वाढल्याने यंदा रंग, गुलाल आणि पिचकार्‍यांचे दर वाढले आहेत. साध्या पिचकार्‍यांच्या किंमती 150 ते 300 रुपये तर आकर्षक पिचकार्‍यांच्या किंमती 500 रुपयांपर्यंत आहेत. तसेच ऑर्गेनिक रंग आणि गुलालही महागला आहे.महागाईमुळे ग्राहक नाराज असले तरी उत्साहात कोणतीही कमी नाही. बाजारात रंगीबेरंगी रंगांची आवक झाली असून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

No comments

Powered by Blogger.