चीनची नवी खेळी, भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी
भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय
प्रसारमाध्यमं तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. चिनी सरकारचं
मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स तसंच वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय
प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. यादरम्यान चिनी सरकारने नवी खेळी करत
भारतीय वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर बंदी आणली असून ब्लॉक केल्या आहेत.
एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
भारतीय टीव्ही चॅनेल्स सध्या आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत.
पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम
करत नाही आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नागरिक फक्त
व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे
तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील
ब्लॉक केलं जाऊ शकतं.
१५ जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक
झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या चकमकीत दोन्ही देशांचं नुकसान
झालं असून भारताचे २० जवान शहीद झाले आहेत तर चिनी सैनिकही ठार झाले आहेत.
चीनने भारतीय वृत्तपत्र आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचा निर्णय भारताने ५९
अॅपवर बंदी घालण्याच्या आधीच घेतला असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं जात
आहे. साऊथ चीन मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनने ब्लॉक करण्यात
आलेल्या वेबसाईट्सची संख्या जवळपास १० हजार झाली आहे. यामध्ये सोशल
नेटवर्किंग साइट फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप याशिवाय ब्लूमबर्ग, वॉल
स्ट्रीट जर्नल, द न्यूयॉर्क टाइम्स यांचाही समावेश आहे.
५९ अॅपवर बंदी
लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अॅपसह एकूण ५९ अॅपवर बंदी घातली. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.

चीनची प्रतिक्रिया
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी, भारताने उचललेल्या पावलानंतर चिंतेत असल्याचं म्हटलं असून परिस्थितीची पडताळणी सुरू असल्याचं सांगितलं आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी, भारताने उचललेल्या पावलानंतर चिंतेत असल्याचं म्हटलं असून परिस्थितीची पडताळणी सुरू असल्याचं सांगितलं आहे.
Post a Comment