आजचे राशीभविष्य
मेष:-कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून
कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू
नका. कामात स्थैर्य आणावे लागेल.
वृषभ:-दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. वडीलांना मदत
करावी लागेल. तुमच्यातील कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कौटुंबिक खर्चाचा
पुनर्विचार करावा लागेल. स्वभावात हेकेखोरपणा वाढू शकतो.
मिथुन:-आपले विचार भरकटू देऊ नका. हजरजबाबीपणे उत्तरे
द्याल. गप्पांमधून स्वत:चे मत खरे करून दाखवाल. काही आनंद क्षणिक असतील.
आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.
कर्क:-जोडीदाराची साथ आवश्यक राहील. शांतपणे गोष्टी
जुळवून आणाव्यात. चुकीच्या लोकांच्यात वावरू नका. संपर्कातील लोकांच्यात
आपली माणसे ओळखा. आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह:-हातात नवीन अधिकार येतील. कामातून चांगले समाधान
मिळेल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील. कामाला अपेक्षित गती येईल. आजचा
दिवस चांगला जाईल.
कन्या:-मनातील निराशा झटकावी लागेल. उत्साहाला खतपाणी
घालावे लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा
लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
तूळ:-अकारण नैराश्य येऊ शकते. तुमच्यातील चैतन्य जागृत
ठेवावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना काळजी
घ्यावी. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो.
वृश्चिक:-तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन स्फूर्तीने
कामे हाती घ्याल. कामाची व्यापकता वाढेल. दिवस भटकंतीत जाईल. जोडीदार
तुमच्यावर खुश राहील.
धनू:-आर्थिक कामात सावधानता बाळगावी. काही कौटुंबिक
चिंता सतावतील. अति विचारात भरकटू नका. घरगुती वातावरण शांत ठेवावे लागेल.
दोन पाऊले मागे घेण्यास हरकत नाही.
मकर:-वैचारिक आंदोलने जाणवतील. जुन्या गोष्टी उगाळत
बसू नका. जोडीदाराशी सल्लामसलत करावे. छंद जोपासण्यात वेळ घालवा. धार्मिक
ग्रंथांचे वाचन करावे.
कुंभ:-मानसिक चांचल्य जाणवेल. वैचारिक दिशा बदलून
पहावी. बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा. आर्थिक कामे जपून करावीत.
कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत.
मीन:-बौद्धिक कुशलतेवर कामे कराल. व्यापारातून चांगला
आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचा प्रवास मजेत पार
पडेल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर
Post a Comment