दहिसरमध्ये वाहतूक कोंडी, घोडबंदरपर्यंत वाहनांच्या रांगा

आठवडयाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. दहिसरच्या दिशेने येणाऱ्या काश्मिर ब्रीजच्या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरु असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.
पोलिसांकडून दहिसर येथे तपासणी सुरु असल्याने ठाणे घोडबंदरपर्यंत वाहनांची मोठी रांग लागली आहे. मुंबई-ठाण्यात प्रवेशाच्या आणि एक्झिट पॉईंटवर पोलिसांकडून कठोर तपासणी सुरु आहे.
मुलुंडमध्ये सुद्धा हिच स्थिती आहे. गोगलगायीच्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत. वाहनचालकांना थोडेस अंतर कापण्यासाठी सुद्धा अर्धा ते एक तास थांबून रहावे लागत आहे. एकतर लॉकडाउन हटवा किंवा तसाच ठेवा पण कामावर जाणाऱ्यांना त्रास देऊ नका असे एका युझरने म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.